दह्याळे शाळेत बालदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दह्याळे शाळेत बालदिन उत्साहात
दह्याळे शाळेत बालदिन उत्साहात

दह्याळे शाळेत बालदिन उत्साहात

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस अर्थात बालदिनानिमित्त सोमवारी जिल्हा परिषदेच्या दह्याळे येथील उच्च प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या स्वाती राऊत, दह्याळे गावचे सरपंच सुनील भोईर उपस्थित होते. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच शाळेची शैक्षणिक, भौतिक सुविधा या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाती राऊत यांनी मुलांना बिस्कीट वाटप केले, तसेच सुंदर चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका गीता भावर, मेघलता सावंत, राजेश भोईर, संतोष तळेकर, यशोदीप धनराळे, सेवक रूढे आदी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.