अस्नोली शाळेत बालदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्नोली शाळेत बालदिन साजरा
अस्नोली शाळेत बालदिन साजरा

अस्नोली शाळेत बालदिन साजरा

sakal_logo
By

किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : अस्नोली जिल्हा परिषद शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या अस्नोली शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध गाणी, गोष्टी, नृत्य, नाटिका या कलांचे सादरीकरण करून रंगत आणली. शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांनी पर्यवेक्षक, मार्गदर्शकाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात निवड झालेल्या पाचवीची नवोदय पात्र विद्यार्थिनी हेमांगी गवाळे हिचे विशेष कौतुक करण्यात आले. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाचा समारोप सर्व मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व संचालन विद्यार्थ्यांनीच केले होते.