बालदिनानिमित्त शाळेत मेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालदिनानिमित्त शाळेत मेळा
बालदिनानिमित्त शाळेत मेळा

बालदिनानिमित्त शाळेत मेळा

sakal_logo
By

मालाड, ता. १४ (बातमीदार) ः मनोरी येथील ज्ञानसाधना प्राथमिक माध्यमिक विद्यालयात बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस बालगोपाळांचा धम्माल आनंदाचा! अशा प्रकारे शाळेच्या प्रांगणात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. बच्चे कंपनीने विविध चविष्ट खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. या बाल मेळ्यात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकांनी उत्साहात सहभागी होऊन बाल मेळा यशस्वी करत आनंद लुटला.