जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरतर्फे सर्विस कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरतर्फे सर्विस कॅम्प
जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरतर्फे सर्विस कॅम्प

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरतर्फे सर्विस कॅम्प

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर इंडियातर्फे सोमवारपासून हॉलिडे सर्व्हिस कॅम्पला सुरुवात झाली. १९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कॅम्पमध्ये ग्राहकांना सर्वसमावेशक वाहन तपासणी आणि ब्रॅण्‍डेड गुड्स, अॅक्सेसरीज व मूल्‍यवर्धित सेवांवर आकर्षक ऑफर्सचा लाभ देण्यात येणार आहे. उच्‍च प्रशिक्षित जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हर तंत्रज्ञांकडून सर्व वाहनांची पाहणी करून आवश्‍यक असल्‍यास जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हरच्या पार्ट्स बसवून त्यांची वॉरंटी दिली जाणार आहे. या कॅम्पमध्ये ३२-पॉइण्‍ट इलेक्‍ट्रॉनिक व्हेईकल हेल्‍थ चेक-अप, ब्रेक व वायपर चेक, टायर व फ्लुईड लेव्‍हल चेक, तसेच सर्वसमावेशक बॅटरी हेल्‍थ चेक अशा सेवा देण्यात येतील.