खर्डीतील जीर्ण शाळा कोसळण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डीतील जीर्ण शाळा कोसळण्याची भीती
खर्डीतील जीर्ण शाळा कोसळण्याची भीती

खर्डीतील जीर्ण शाळा कोसळण्याची भीती

sakal_logo
By

खर्डी, ता. १४ (बातमीदार) : २१ वर्षांपूर्वी केरळ पॅटर्नमध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेची नवीन इमारत झाल्याने त्यामध्ये शाळा भरली जात आहे; तर जुन्या शाळेत गर्दुल्ले व दारुड्यांचा उपद्रव वाढला आहे.
जीर्ण झालेल्या या इमारतीच्या पुढील जागेत शाळेतील विध्यार्थी खेळत असल्याने येथे अनुचित प्रकार घडून नाहक विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते. गेली अनेक वर्षे येथील बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी हक्काचे गाळे नसल्याने व गोरगरीब जनतेला छोटे घरगुती कार्यक्रम करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही जीर्ण इमारत पाडावी. तसेच त्या जागी ग्रामपंचायतीने सभागृह व व्यापारी गाळे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
गेल्या वीस वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अंगणवाडीतील मुलांचे थंडी व उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी इमारतीवर स्लॅब टाकून त्यावर कौले घातली आहेत. त्यावर पुन्हा स्लॅब टाकून इमारत बांधली होती; परंतु या इमारतीचा एकही दिवस वापर न झाल्याने ती पडून आहे. सध्या या इमारतीत गर्दुल्ले व दारुडे यांचा राबता असून या इमारतीचा काही भाग कोसळला असून इतर भाग कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने येथे नाहक एखाद्याचा बळी जाऊ शकतो.

...................
दुरवस्था झालेली इमारत पाडून त्या जागी ग्रामपंचायत सभागृह व व्यापारी गाळे बांधून बेरोजगारांना रोजगार करण्याची संधी निर्माण करून द्यावी.
- सुमित भोईर, समाजसेवक

.......................
सदर इमारतीची दुरवस्था व तिचा गैरवापर पाहता ही इमारत पाडण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- मोसीम शेख, उपसरपंच, खर्डी ग्रामपंचायत