रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील प्रथम
रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील प्रथम

रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील प्रथम

sakal_logo
By

रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील प्रथम
वसई, ता. १४ (बातमीदार) : शिवसेना व शिवप्रेरणा फाऊंडेशन यांच्यातर्फे ऑनलाईन घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध आकर्षक रांगोळ्या स्पर्धकांनी रेखाटल्या होत्या. यात प्रथम क्रमांक कुमारी दिशा पाटील; तर कुमारी नेत्रा बगाडीया हिने व्दितीय, नेहा चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख व शिवप्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम, सचिव योगेश पाटील, खजिनदार राहुल पाटील, युवासेना वसई शहर अधिकारी ह्रितिक शिंदे व दक्षिल पटेल उपस्थित होते.