अथर्व फाऊंडेशनतर्फे ‘ऑल प्ले कार्निव्हल ऑफ जॉय’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अथर्व फाऊंडेशनतर्फे ‘ऑल प्ले कार्निव्हल ऑफ जॉय’
अथर्व फाऊंडेशनतर्फे ‘ऑल प्ले कार्निव्हल ऑफ जॉय’

अथर्व फाऊंडेशनतर्फे ‘ऑल प्ले कार्निव्हल ऑफ जॉय’

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः अथर्व फाऊंडेशन आणि ऑल प्ले प्रॉडक्शनतर्फे बोरिवलीतील शाळकरी मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑल प्ले अ कार्निव्हल ऑफ जॉय’मध्ये शेकडो मुलांनी आपले कलागुण दाखवले. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा सोहळा झाला. यात विद्यार्थ्यांनी नाटक, गाणी, कविता आणि एकपात्री सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य सादरीकरण आणि वर्षा राणे दिग्दर्शित व द्वारका प्रसाद माहेश्वरी लिखित ‘वीर तुम बढे चलो’ या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. या वेळी राजनैतिक अधिकारी सतींदर एस. अहुजा, अभिनेते अरुण नलावडे, खासदार गोपाळ शेट्टी, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, फाऊंडेशनच्या विश्वस्त वर्षा राणे आदी मान्‍यवर हजर होते. शाळकरी विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सुनील राणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.