टाईप २ मधुमेहासाठी ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ थेरपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाईप २ मधुमेहासाठी ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ थेरपी
टाईप २ मधुमेहासाठी ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ थेरपी

टाईप २ मधुमेहासाठी ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ थेरपी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ‘ट्विन हेल्थ’ या सेंन्सर्स, मशीन लर्निंग आणि वैद्यकीय विज्ञानाचा समावेश असलेल्या आरोग्य व्यासपीठाने ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ या तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. त्‍यांनी या तंत्रज्ञानासाठी पेटंट घेतले असून टाईप २ मधुमेहामुळे होणारे विविध आजार जसे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डीसीज यांच्या निवारणासाठी अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए), अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी(एएसीई), इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ), अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजीज अ‍ॅंड ट्रीटमेंट फॉर डायबिटीज (एटीटीडी) इत्यादींकडून आयोजित करण्यात आलेल्या वैज्ञानिक सत्रांमधील मान्यतेद्वारे ते प्रमाणित करण्यात आले आहे.
या उपचारपद्धतींमध्ये टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी कमीत कमी ३ महिने मधुमेहावरील औषधे न घेता सामान्य रक्तातील ग्लुकोज (रक्तातील साखर) टिकवून ठेवणे अशा प्रकारे निवारण उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात अमेरिकन डायबिटीज असोसिएशनला ‘ट्विन हेल्थ’च्या वतीने वैद्यकीय विविध संशोधनपर कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्‍या डायबिटीज जर्नलमध्‍ये याबाबतचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. यात रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचा निष्कर्ष याद्वारे काढण्यात आला. ९२ टक्‍के रुग्‍णांनी इन्‍सुलिनसह सर्व मधुमेह औषधोपचार बंद केले. तसेच रुग्‍णांचे सरासरी वजन ९.१ किलो ग्रॅमने कमी झाले.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने टाइप २ मधुमेह निवारणासाठी ‘होल बॉडी डिजिटल ट्विन’ सक्षम अचूक उपचारांना मान्यता दिली आहे. यामुळे क्रॉनिक आजारांपासून सुटका व योग्य उपचार पद्धती देऊन नागरिकांना आनंदी जीवन देण्यास मदत होईल.
– डॉ. परामेश शमन्, वैद्यकीय संचालक, ट्विन हेल्‍थ