सेवेला धावून जाणे ख्रिस्ती धर्मीयाचे कर्तव्य : मच्याडो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवेला धावून जाणे ख्रिस्ती धर्मीयाचे कर्तव्य : मच्याडो
सेवेला धावून जाणे ख्रिस्ती धर्मीयाचे कर्तव्य : मच्याडो

सेवेला धावून जाणे ख्रिस्ती धर्मीयाचे कर्तव्य : मच्याडो

sakal_logo
By

विरार, ता. १४ (बातमीदार) : चर्चमध्ये नियमित जाणे आणि प्रार्थना करणे इतकाच केवळ कॅथॉलिक श्रद्धेचा भाग नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवा पुरविणे हे ख्रिस्ती श्रद्धेचे तीन प्रमुख भाग आहेत, असे वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले.
वसई, बंगली येथील कार्डिनल ग्रेशस मेमोरिअल हॉस्पिटलच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आर्चबिशप मच्याडो उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून या हॉस्पिटलचे हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. राजीव शर्मा आणि वसई विरार शहर महापालिकेच्या उपायुक्त डॉ. चारूशीला पंडित उपस्थित होत्या.
आर्चबिशप डॉ. मच्याडो म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा मदतीचा हात पुढे करण्याचे कर्तव्य प्रत्येक ख्रिस्ती धर्मीयाचे आहे. देशात ख्रिस्तीधर्मीय किती टक्के आहेत, हे महत्त्वाचे नाही. सेवा पुरविण्याच्या श्रद्धेतून कोविड महामारीच्या काळात अनेक ख्रिस्तीधर्मीय व संस्था मदतीसाठी धावत गेल्या. वसईतील सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजची नवी इमारत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली. या वेळी कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलच्या सेवेत ४० वर्षे कार्यरत असलेल्या सुमारे ११ कर्मचाऱ्‍यांचा सत्कार करण्यात आला. हॉस्पिटलचे मुखपत्र असलेल्या ‘आरोग्य संपदा’ नियतकालिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आर्चबिशपांच्या हस्ते करण्यात आले.