भायखळ्यात भंगार गोदामाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भायखळ्यात भंगार गोदामाला आग
भायखळ्यात भंगार गोदामाला आग

भायखळ्यात भंगार गोदामाला आग

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : मुंबईतील भायखळा पश्चिम येथील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास घडली. भायखळा येथील के. के. मार्गावर हे गोदाम आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांतच आग आटोक्यात आणली. सहा-सात गोदामांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.