युवासेनेच्या वतीने गोवंडीत बाल महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवासेनेच्या वतीने गोवंडीत बाल महोत्सव
युवासेनेच्या वतीने गोवंडीत बाल महोत्सव

युवासेनेच्या वतीने गोवंडीत बाल महोत्सव

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १५ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजी नगरमध्ये युवासेनेच्या वतीने रविवारी (ता. १३) बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील व उपविभागप्रमुख तात्या सारंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना केक भरवत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुलांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, तसेच रॅम्प वॉक, नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या किलबिलाटत हे आयोजन पार पडले. विविध वेशभूषेत लहान मुलांनी रॅम्प वॉक तसेच नृत्य सादरीकरण केले. बक्षीस वितरण समारंभाने या आयोजनाची सांगता झाल्याची माहिती युवा सेना अधिकारी गणेश वाव्हळ यांनी दिली.