समता विद्या मंदिरात बालदिनाचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समता विद्या मंदिरात बालदिनाचा जल्लोष
समता विद्या मंदिरात बालदिनाचा जल्लोष

समता विद्या मंदिरात बालदिनाचा जल्लोष

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः साकीनाका येथील समता विद्या मंदिरात बालदिन जल्लोषत साजरा करण्यात आला. पंडित नेहरू यांचे विचार बालमनावर रुजण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या पुष्करणी सुभेदार, कार्याध्यक्ष राजेश सुभेदार आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या वेळी चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तसेच मुलांनी धमाल बालगीते व नृत्य याचा पुरेपूर आनंद लुटला. शाळेतील मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील सर्व विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. शाळेतील सर्व मुलांना पुष्करणी सुभेदार यांनी खाऊ दिला.