चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : बालदिनाच्‍या निमिताने अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेर विभागातील हेरंभ मंदिरात चित्रकला स्पर्धा, तर शिवगंगानगरमध्ये बाल मेळावा घेण्‍यात आला. चार गटात झालेल्या स्पर्धेत विविध ठिकाणच्या सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भरत आवरे, शुभदा कर्णिक, देविका पाताडे, वैष्णवी ओक, तनया सोमण आणि स्नेहा सुभेदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मंदिर समितीच्या उपाध्यक्षा इंदू पाताडे, भरत आवरे आणि शुभदा कर्णिक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. शिवगंगानगरमध्ये माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या वतीने बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बग्गीमधून बच्चे कंपनीने फेरफटका मारून मनमुराद आनंद घेतला.