लोनाड येथे ‘सर्टिफिकेट डे’ उत्साहात साजरा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोनाड येथे ‘सर्टिफिकेट डे’ उत्साहात साजरा.
लोनाड येथे ‘सर्टिफिकेट डे’ उत्साहात साजरा.

लोनाड येथे ‘सर्टिफिकेट डे’ उत्साहात साजरा.

sakal_logo
By

पडघा, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील लोनाड येथे मेकअप आर्टिस्ट यांचा सन्मान करणारा ‘सर्टिफिकेट डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील लोनाड येथील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजना हनुमान भोईर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी ठाणे जिल्ह्यातील ३० मेकअप आर्टिस्ट सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात विविध मेकअप आर्टिस्ट यांनी आपली कला दाखवून उपस्थितांची मने जिंकली. सहभागी झालेल्या सर्व मेकअप आर्टिस्ट यांना आयोजिका संजना भोईर, हनुमान भोईर व उपस्‍थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.