ठाण्‍यात उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रदान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्‍यात उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रदान सोहळा
ठाण्‍यात उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रदान सोहळा

ठाण्‍यात उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रदान सोहळा

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : जवाहर वाचनालय, कळवा यांच्या विद्यमाने उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी ब्राह्मण सभा, कळवा येथे संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. यामध्ये २०२१ या वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यकृतींमधील एका उत्तम साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. हे आयोजन गेली १४ वर्षे केले जात आहे. या वर्षी या पुरस्कार सोहळ्याचे हे १५ वे वर्ष असून या वर्षी हा पुरस्कार ‘कालकल्लोळ’ या लेखसंग्रहाकरिता ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखक अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे. ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल यांच्या हस्ते हा पुरस्कार अरुण खोपकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.