प्लास्टिकविरोधात केडीएमसी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकविरोधात केडीएमसी आक्रमक
प्लास्टिकविरोधात केडीएमसी आक्रमक

प्लास्टिकविरोधात केडीएमसी आक्रमक

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना कल्याण-डोंबिवली शहरात त्याचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. अशा बेशिस्त वागणाऱ्यांविरोधात केडीएमसीने कारवाई सुरू केली असून मागील १० महिन्यांत ४७० किलो प्लास्टिक जप्त करत सुमारे १८ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील कचराप्रश्न बिकट होत चालला असून त्या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी केडीएमसी घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या घनकचरा विभाग उपमुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे यांच्या पथकाने विविध उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. एकीकडे समस्या दूर करण्यासाठी सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांच्या बैठकी घेऊन जनजागृती करत असताना बेशिस्त वागणाऱ्या नागरिकांच्या विरोधात धडक कारवाई सुरुवात केल्याने नागरिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

............................
प्लास्टिक पिशव्या वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे आमचा उद्देश नाही. शहर प्रदूषण आणि कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा असून आम्ही सर्व स्तरातील संस्था आणि संघटना यांच्या बैठका घेत आहे. आता नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
- अतुल पाटील, उपायुक्त, केडीएमसी घनकचरा विभाग