युनिटी कॉम्प्लेक्समध्ये बालदिनानिमित्त चित्रकला स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युनिटी कॉम्प्लेक्समध्ये बालदिनानिमित्त चित्रकला स्‍पर्धा
युनिटी कॉम्प्लेक्समध्ये बालदिनानिमित्त चित्रकला स्‍पर्धा

युनिटी कॉम्प्लेक्समध्ये बालदिनानिमित्त चित्रकला स्‍पर्धा

sakal_logo
By

मालाड, ता. १५ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील युनिटी संकुल, राजन पाडा येथे बालदिनाचे औचित्य साधून सोसायटीतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या वेळी गट क्रमांक १ ते ५ मध्‍ये अनुक्रमे साहिल धोंडे, आस्था रेडीज, देवांश कोरी, वृंदा राजापूरकर आणि सौरीन गिध यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते एस. एन. अली व एस. टी. एस. मिशन प्रायमरीच्या मुख्याध्यापिका ज्योती विचारे प्रमुख पाहुण्या म्‍हणून उपस्थित होत्या. सचिव संदीप घाग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष लालजी कोरी यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू देण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते केक कापून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्र सेवादल मालवणीचे पदाधिकारी प्रकाश जैस्वार या वेळी आवर्जुन उपस्थित होते.