अभिनेते सचिन पिळगावकर गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेते सचिन पिळगावकर गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित
अभिनेते सचिन पिळगावकर गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित

अभिनेते सचिन पिळगावकर गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. बालदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला.
गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. सर्वप्रथम सदाबहार सचिन या कार्यक्रमाच्या अंतर्गत गांधारच्या सर्व कलाकारांनी आपल्या गाण्यातून व नृत्यातून सचिन पिळगावकर यांच्या प्रवासाची ओळख प्रेक्षकांना करून दिली. अखियोंके झरोकोंसे, आली माझ्या घरी दिवाळी, आयत्या घरात घरोबा ते अगदी बडे अच्छे लगते है, अशी गाणी गात गंधारच्या बालगायक व वाद्यवृंदांनी या सोहळ्याची जोरदार सुरुवात केली. पुढे हृदयी वसंत फुलताना, घे पाऊल पुढं जरा, ही दुनिया मायाजाल, अलबेला जयराम व बनवाबनवी अशा अनेक गाण्यांवर ताल धरत गांधारच्या कलाकारांनी नृत्य सदर करत साचिन पिळगावकर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास उलगडला.
या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, दिग्दर्शक विजू माने, आमदार संजय केळकर, कवी अशोक बागवे, गंधार सर्वेसर्वा मंदार टिल्लू, विनय जोशी, प्रदीप धवल व आशिष शेलार असे अनेक दिगज्ज मान्यवर उपस्थित होते.