ठाणे फेरीनिमित्त ऐतिहासिक गोष्टींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे फेरीनिमित्त ऐतिहासिक गोष्टींना उजाळा
ठाणे फेरीनिमित्त ऐतिहासिक गोष्टींना उजाळा

ठाणे फेरीनिमित्त ऐतिहासिक गोष्टींना उजाळा

sakal_logo
By

ठाणे, ता १५ (बातमीदार) : ठाणे शहर हे तलावांचे शहर व सांस्कृतिक वारसा असणारे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ठाणे शहराला अडीच हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. याच इतिहासाची माहिती ठाणेकरांना समजावी यासाठी स्वान ५२ या संस्थेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बदललेले ठाणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी बालदिनानिमित्त ठाण्यातील नागरिकांना मिळाली. या कार्यक्रमामध्ये या विषयाचे माहितगार अभ्यासक अंकुर काणे हे होते.
ठाणे स्टेशन येथून सुरुवात करून जुनी प्रार्थना स्थळे, प्राचीन काळातील महत्त्वाची बंदरे, तत्कालीन होणारा व्यापार, काही घटनांची साक्ष देणाऱ्या जुन्या इमारती दाखवण्यात आल्या. त्याचप्रमाणे रस्त्याखाली दडलेली पेशवेकालीन विहीर, ब्रिटिशकालीन जेल, पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला, बीवलकरांनी आणि नाईक यांनी ठाणे शहरासाठी केलेली भरीव कामगिरी अशा एक ना अनेक वस्तुस्थिती असलेल्या आणि इतिहासाची जोड असलेली स्थळे, घटना, व्यक्ती इत्यादींबद्दल इतिहास अभ्यासक अंकुर काणे यांनी तपशीलवार माहिती दिली.