कल्याणमध्ये घरातून मोबाईलची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये घरातून मोबाईलची चोरी
कल्याणमध्ये घरातून मोबाईलची चोरी

कल्याणमध्ये घरातून मोबाईलची चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : कल्याण पश्चिम येथील बैल बाजार येथील परिसरात पेट्रोल पंपाजवळ राहणारे प्रेमनाथ मोदगीकर यांच्या घरातून मोबाईलची चोरी झाली आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने घरात प्रवेश केला आणि मोबाईल चोरून नेला. यावेळी प्रेमनाथ मोदगीकर यांच्या मुलीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने जोरात धक्का देऊन तेथून पळ काढला. याप्रकरणी प्रेमनाथ मोदगीकर यांनी शाहरुख फिरोज खान या चोरट्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.