सावरोली ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरोली ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन
सावरोली ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन

सावरोली ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन

sakal_logo
By

किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : किन्हवली परिसरातील सावरोली (सो) येथील ओम साई सेवा मित्र मंडळाच्या वतीने साईधाम मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी असे २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सहा दिवसांच्या पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या पदयात्रा उपक्रमाचे हे १० वे वर्ष असून दिवंगत अध्यक्ष रघुनाथ आरज यांनी सुरू केलेल्या हा पालखी सोहळा निरंतर सुरू राहावा यासाठी मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील साईभक्त सतत प्रयत्नशील आहेत. ज्या साईभक्तांना या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपल्या पासपोर्ट साईझ फोटोसह रुपये ७३० सभासद वर्गणी जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी व सभासद वर्गणी जमा करण्यासाठी विजय पाटील ९२०९५२४६८२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.