क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती उत्साहात
क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती उत्साहात

क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती उत्साहात

sakal_logo
By

मोखाडा, ता. १५ (बातमीदार) : आदिवासी जननायक, १८ व्या शतकातील क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पालघर जिल्हा आणि मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम सावर्डे गावातील आदिवासी महिला व लहान मुले या जयंती उत्सवात सहभागी झाले होते. बिरसा मुंडा यांची वेशभूषा करून त्यांचा स्वातंत्र्य लढा या मुलांनी जाणून घेतल्याने, क्रांतिकारक बिरसा मुंडा आता नव्या पिढीला समजू लागले आहेत.
आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची कारकीर्द सन १८७५ ते १९०० दरम्यान अवघ्या २५ वर्षांची आहे. १८ व्या शतकात त्यांनी जुलमी ब्रिटिश राजवटी विरोधात यल्गार पुकारला होता. ऐन तरुण वयात त्यांना हौतात्म्य आले होते. त्यांचा हा इतिहास अजरामर झाला आहे. प्रतिवर्षी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी समाज तसेच शासकीय स्तरावर उत्साहात साजरा केली जाते. यावर्षीही मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी त्यांची जयंती त्याच पद्धतीने साजरी केली आहे.