दुचाकी धडकेत एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी धडकेत एक गंभीर
दुचाकी धडकेत एक गंभीर

दुचाकी धडकेत एक गंभीर

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) : सायवन कासा या मार्गावर मंगळवारी दुपारी वाघाडी गावाजवळ दोन दुचाकींची धडक झाली. यात सुधाकर भुसारा (रा. शेंनसरी) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला कासा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कासा येथून शेलवासकडे जाणारी वाहने भरधाव वेगात जात असतात. अनेक चढण व उताराचा हा मार्ग असून दुचाकीस्वार वेगाने जात असल्याने अनेक अपघात येथे झाले आहेत. मंगळवारी झालेला अपघात हा वाघाडी येथे असलेल्या भीम बांध या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाजवळ झाला आहे. येथे रस्तावर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने वळणावर समोरून येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत. त्यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देऊन हे गवत, झाडे झुडपाची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.