रोहा-दिवा मेमूला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा-दिवा मेमूला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी
रोहा-दिवा मेमूला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी

रोहा-दिवा मेमूला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी

sakal_logo
By

खासदार सुनील तटकरेंच्या प्रयत्नांना यश

रोहा, ता. १५ (बातमीदार) ः रोहा-दिवा मेमू ट्रेनला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून तसे आदेश संबंधित खात्याचे उपनिर्देशक विवेककुमार सिंह यांच्याकडून पारित करण्यात आले आहेत. त्‍यामुळे लवकरच दिवा-रोहा प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. रोहा-दिवा मेमू ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. लोकसभेच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
रोहा, तळा, म्हसळा, मुरूड या समवेत ग्रामीण भागातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने पनवेल, दिवा, मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरी व व्यवसायनिमित्त ये-जा करतात. तसेच पनवेल, मुंबई या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
रोह्याहून पहाटे ५ नंतर मुंबई अथवा पनवेलला जाण्यासाठी दुसरी गाडी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची हाल होतात. त्यामुळे रोहा स्थानकावरून लवकरात लवकर मेमू सुरू करावी, अशी मागणी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने खासदार तटकरे यांचेकडे केली होती.

रोहा-दिवा मेमू ट्रेन सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी रोह्यातून सुटणार असून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी दिवा येथे पोहचेल तर सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी दिवा येथून सुटणार असून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी रोहा येथे पोहचेल. या गाडीमुळे विद्यार्‍थ्‍यांसह प्रवाशांना दिलासा मिळेल
- सुनील तटकरे, खासदार