मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाच्या भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिला पोलिस उपनिरीक्षकाने केली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत गुलाबराव शिंदे (वय २९) हा मुंबईतील समता नगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक असून क्यूआरटी पथकात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे; तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी ३० वर्षीय महिला पोलिस उपनिरीक्षक नवी मुंबईत कार्यरत आहे. ही महिला चार वर्षांपूर्वी नाशिक येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात असताना अनिकेत याने महिला उपनिरीक्षकाशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाच्या भूलथापा देऊन शारीरिक संबंध निर्माण केल्याचा आरोप महिला पोलिस उपनिरीक्षकाने केला. मागील काही महिन्यांपासून अनिकेतने महिला उपनिरीक्षकाला टाळण्यास व लग्न करण्यास नकार दिल्यानंतर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ- १ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.