खर्डी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी
खर्डी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

खर्डी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

sakal_logo
By

खर्डी (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील खर्डी-कसारा परिसरात गेल्या १० दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. ठाकूर पाडा येथे जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याने वासरू जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावून पिंजरा लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन खर्डी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. चिखले यांनी केले आहे. खर्डी-कसाऱ्यातील माळ पठारावरील ठाकूरपाडा येथील लक्ष्मण पारधी यांच्या शेताच्या आवारात सकाळच्या वेळी गुरे चरण्यासाठी गेली असता वासरावर बिबट्याने हल्ला करून फस्त करण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी आरडाओरड करताच बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली; मात्र सद्यःस्थितीत गंभीर जखमी झालेल्या वासराची प्रकृती नाजूक असल्याचे पारधी यांनी सांगितले. याबाबत वनपाल एस. बी. गाठे, एस. एस. अहिरे आणि वनरक्षक डी. डी. ठोंबरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.