केळवे ग्रामपंचायतीतर्फे बिरसा मुंडा जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे ग्रामपंचायतीतर्फे बिरसा मुंडा जयंती
केळवे ग्रामपंचायतीतर्फे बिरसा मुंडा जयंती

केळवे ग्रामपंचायतीतर्फे बिरसा मुंडा जयंती

sakal_logo
By

पालघर, ता. १५ (बातमीदार) : केळवे ग्रामपंचायतीतर्फे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. तारपा नृत्य, ढोलकी नृत्य, गौरी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी तळेगाव गावातील सरपंच संदीप किणी, उपसरपंच राजेश सालकर, ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे, आदिवासी एकता परिषदेचे दत्तात्रय करबट, आदिवासी विकास प्रतिष्ठानचे जयेश वांगड व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पालघर येथेही चार रस्त्यावर शिवाजी चौकात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार घालून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, आदिवासी एकता परिषदेचे अशोक ठाकरे आदी उपस्थित होते.