तरुणांनी श्रमदानातून बुजविले खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी श्रमदानातून बुजविले खड्डे
तरुणांनी श्रमदानातून बुजविले खड्डे

तरुणांनी श्रमदानातून बुजविले खड्डे

sakal_logo
By

मनोर, ता. १५ (बातमीदार) : मनोर पालघर रस्त्यावर हात नदी पुलालगतच्या वळणावरील खड्डे बुजविण्यासाठी मनोर गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी मनोर गावातील तरुणांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले. मनोर पालघर रस्त्यावर धोकादायक खड्डे पडलेले असताना महामार्ग विभागाचे दुर्लक्ष वाहनचालक आणि दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती तरुणांनी दिली. मनोर शहरातील मजहर कोके, सैबाज आवारी आणू त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान केले. तरुणांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.