लाच प्रकरणात पोलिस शिपाई अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच प्रकरणात पोलिस शिपाई अटकेत
लाच प्रकरणात पोलिस शिपाई अटकेत

लाच प्रकरणात पोलिस शिपाई अटकेत

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी करणारा काशीमिरा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई रामचंद्र बांगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याप्रकरणातील तक्रारदाराने काशीमिरा भागात हॉटेल सुरू केले होते. हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी पोलिस शिपाई रामचंद्र बांगर याने तक्रारदारकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदाराला पुन्हा काशीमिरा पोलिस ठाण्यात बांगर याच्याकडे पाठवण्यात आले. त्यावेळी बांगर याने तडजोड म्हणून १५०० रुपयांची मागणी केली. तक्रारीची खात्री झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व तक्रारदाराला ठरलेले पैसे घेऊन पुन्हा बांगर याच्याकडे पाठवण्यात आले. त्यावेळी बांगर याने पैसे पोलिस ठाण्याला लागून असलेल्या चहावाल्याकडे द्यायला सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने ते पैसे चहावाला शाम पंडित याला दिले. हे पैसे स्वीकारत असताना पंडित याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले त्यांनतर पोलिस ठाण्यात असलेल्या बांगर यालाही ताब्यात घेण्यात आले.