डी. के. बामणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. के. बामणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार
डी. के. बामणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार

डी. के. बामणे यांना शिक्षकरत्न पुरस्कार

sakal_logo
By

पेण (वार्ताहर) : पेण एज्युकेशन सोसायटीमध्ये गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे; तसेच सामाजिक क्षेत्राची आवड असणारे शिक्षक डी. के. बामणे यांना शिवराज्य प्रतिष्ठानतर्फे सोमवारी (ता. १४) छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेचा प्रथम वर्धापनदिन पेण तालुक्यातील जावळी येथे झाला. त्‍या वेळी अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार धैर्यशील पाटील, मंगेश दळवी, रघुनाथ दळवी, डी. बी. पाटील, संस्थेचे तालुकाध्यक्ष ॲड. रोशन पाटील, विकी पाटील, दिवेकर उपस्थित होते.