एफडीएकडून एक कोटींचा सुकामेवा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफडीएकडून एक कोटींचा सुकामेवा जप्त
एफडीएकडून एक कोटींचा सुकामेवा जप्त

एफडीएकडून एक कोटींचा सुकामेवा जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील मेमर्स पी. एम. कोल्ड स्टोरेजवर धाड टाकली. यात १ कोटी ७ लाख ३ हजार २५० रुपयांचे सुकामेवा व तत्सम पदार्थ जप्त करण्यात आले. एफडीएची कोल्ड स्टोरेजवर ही दुसरी कारवाई असल्याने आता अन्नपदार्थ साठवणूक करणाऱ्या कोल्ड स्टोरेजवर लक्ष केंद्रित केल्याचे समोर येत आहे.
नवी मुंबईतील एका स्टोरेजमध्ये बुरशीयुक्त बदाम असल्याची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी कारवाई केली होती. मेमर्स पी. एम. कोल्डस्टोरेजवरील कारवाईत खजूर तसेच जीरे अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याने त्या ठिकाणांहून १ लाख ३४ हजार ७३३ किलोचा खजूर; तर २ हजार ८४८ किलो जिरे जप्त केले. या शीतगृहातून १३ अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेला तपासण्यासाठी दिल्याची माहिती देण्यात आली.