आदिवासी पाड्यात बिरसा मुंडे जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी पाड्यात बिरसा मुंडे जयंती साजरी
आदिवासी पाड्यात बिरसा मुंडे जयंती साजरी

आदिवासी पाड्यात बिरसा मुंडे जयंती साजरी

sakal_logo
By

खारघर, ता. १५ (बातमीदार) : शाश्वत फाऊंडेशन आणि श्री तेरापंथ जैन महिला मंडळाच्या वतीने धामोळे पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्यसेना नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. बीना गोगरी यांनी आदिवासी जननायक ''धरती अबा'' बिरसा मुंडा यांच्या जीवनकथेच्या माध्यमातून त्यांचा इतिहास मुलांसमोर उलगडला. या वेळी अंजू पटेल, मंजुला बाबेल, अरुणा सोनी, रेखा जैन, आराधना वर्शने उपस्थित होते. मोदी सरकारने बिरसा मुंडा जयंती हा राष्ट्रीय जनजातीय गौरव दिवस घोषित केल्याची माहिती गोगरी यांनी मुलांना दिली.