रिक्षातील तीन लाखांचा ऐवज तासाभरात परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षातील तीन लाखांचा ऐवज तासाभरात परत
रिक्षातील तीन लाखांचा ऐवज तासाभरात परत

रिक्षातील तीन लाखांचा ऐवज तासाभरात परत

sakal_logo
By

डोंबिवली : सोनारपाडा परिसरात राहणाऱ्या अस्मिता देशपांडे यांनी डोंबिवली स्टेशन परिसरातून घरी जाण्यासाठी सोमवारी (ता. १४) सायंकाळी रिक्षा पकडली. रिक्षातून उतरल्यानंतर आपली पर्स रिक्षातच राहिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रिक्षाचा शोध घेतला; मात्र रिक्षा मिळाली नाही. म्हणून त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, सांगळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत रिक्षाचालकाचा शोध एक तासाच्या आत घेतला. पर्समधील तीन लाख रुपयांचा ऐवज व मोबाईल सहीसलामत परत मिळाल्याने अस्मिता यांनी पोलिसांचे आभार मानले.