चिंचवली-खांडपे सरपंचपदी भावना तारे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवली-खांडपे सरपंचपदी भावना तारे बिनविरोध
चिंचवली-खांडपे सरपंचपदी भावना तारे बिनविरोध

चिंचवली-खांडपे सरपंचपदी भावना तारे बिनविरोध

sakal_logo
By

पडघा, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिंचवली-खांडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भावना तारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच नीलम पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते, त्यानुसार निवडणूक अधिकारी रेखा पाते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या वेळी सरपंचपदासाठी भावना तारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी मावळत्या सरपंच नीलम पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, सदस्य गिरीश पाटील, अतिश बागराव, मोनिका मेघवाले उपस्थित होते. शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, उद्योजक साईनाथ तारे, शिवसेना उपतालुकाप्रमुख हनुमान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली.