मनोर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरळीत
मनोर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरळीत

मनोर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरळीत

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) : दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीजबिल थकल्याने गेल्या वीस वर्षांपासून बंद असलेला वीजपुरवठा ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत कार्यालयात नवीन वीज मीटर बसवून खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला. नव्वदच्या दशकात दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पथदिवे लावण्यात आले होते. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पथदिव्यांच्या वीज वापराचे सुमारे ५५ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायत कार्यालय आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत नवनियुक्त सरपंच अंकिता भोईर आणि उपसरपंच उल्हास ठाकूर यांनी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करून वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय कोल्हे यांना केली होती. ग्रामपंचायतीने हमीपत्र दिल्यानंतर महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश सवरखंड उप केंद्राच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिले होते. मंगळवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दहिसर ग्रामपंचायत कार्यालयाचा वीजपुरवठा सुरू केला. या वेळी सरपंच अंकिता भोईर, उपसरपंच उल्हास ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी भोईर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.