ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

sakal_logo
By

ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : ग्लोबल विकास ट्रस्ट पालघर प्रकल्पांतर्गत पालघर तालुक्यातील पोळे या गावातील २१ शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उटावली येथे सुरेश खंडागळे यांचा गांडूळखत प्रकल्प दाखविण्यात आला. त्यासंदर्भात कल्पेश बोंगे व कृषीतज्ज्ञ आशिष बुजड यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनतर देहर्जे येथील धावजी फरारा यांचा २०००जी९ या जातीच्या केळीची बाग दाखवण्यात आली. केळी पिकातून वर्षाकाठी आपण कशा प्रकारे अधिकाधिक उत्पन्न मिळवू शकतो, त्याला किती भाव मिळतो याविषयी सखोल माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच घानेडे गावातील कुंदन बुंधे यांची १००० मोगरा रोपांची शेती दाखवण्यात आली. मोगऱ्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतामध्ये प्रत्यक्षात लागवड व त्याची माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रगतशील शेतकरी व जीव्हीटीचे कृषीतज्ज्ञ आशिष बुजड यांनी तसेच संस्था स्टाफ यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
शेतीतून आणि त्यातही फळबाग लागवडीतून आपण आपले उत्पन्न कशा प्रकारे वाढवू शकतो, ह्या संदर्भात माहिती मिळण्यासाठी हे विशेष शेतकरी प्रशिक्षण प्रत्यक्षात शेतामध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे नियोजन करताना पालघर प्रकल्पप्रमुख सुधीर चिंता व प्रकल्प समन्वयक अजय सुतार यांचे मोलाचे सहकार्य केले. यावेळी शेतकरी व जीव्हीटी स्टाफ किरण परेड, प्रल्हाद दुमाडा, भरत सापटे, मनोज बुंधे, हर्षद दुमाडे हे उपस्थित होते.