कल्याणमध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम
कल्याणमध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम

कल्याणमध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १६ (बातमीदार) : कल्याणमधील पारनाका येथील अभिनव विद्या मंदिराच्या आनंदी गोपाळ सभागृहात १९ आणि २० नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ठाणे ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे ग्रंथ उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांनी केले आहे. ग्रंथाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवानिमित्त विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे आयोजन ही करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमाची सुरुवात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने होणार आहे.