रामकृष्ण गार्डन रहिवासी संकुलतर्फे बालदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामकृष्ण गार्डन रहिवासी संकुलतर्फे बालदिन साजरा
रामकृष्ण गार्डन रहिवासी संकुलतर्फे बालदिन साजरा

रामकृष्ण गार्डन रहिवासी संकुलतर्फे बालदिन साजरा

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) : बालदिनाचे औचित्य साधून रामकृष्ण गार्डन संकुलात सभासदांतर्फे बालगोपाळांकरिता आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदमेळ्यात बालगोपाळांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यांची विक्री केली. या उपक्रमातून लहान मुलांना व्यवहारज्ञान आणि आर्थिक साक्षरतेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून बालदिन साजरा केला. तसेच आयोजकांतर्फे
बालगोपाळांकरिता मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
रामकृष्ण गार्डन गृहनिर्माण संस्थेतर्फे सभासदांच्या मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. मुलांना व्यवहारज्ञान मिळावे म्हणून विविध पदार्थ बनविणे व त्याची विक्री करणे, यातून गणिताबरोबरच विज्ञानाचे ज्ञानही मिळते. आजची लहान मुले मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. त्यापासून त्यांची सुटका व्हावी, म्हणून असे विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना वेगळ्या क्षेत्रात गुंतवून ठेवले, तर मोबाईलपासून ती मुले दूर होतील, असे पालघरच्या नगरसेविका शिल्पा बाजपेयी यांनी सांगितले.