Udayanraje Bhosale : मराठ्यांच्या शाही सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले रविवारी लावणार उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayan Raje Bhosale
छत्रपती उदयनराजे नालासोपारात

Udayanraje Bhosale : मराठ्यांच्या शाही सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले रविवारी लावणार उपस्थित

sakal_logo
By

विरार : नालासोपाऱ्यात होणाऱ्‍या मराठ्यांच्या शाही सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले रविवारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी पश्चिमेकडील शाम हॉलमध्ये होणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत चालणाऱ्‍या या कार्यक्रमात मराठा उद्योजकांच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

त्यासाठी शंभराहून अधिक स्टॉल सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण उदयनराजे यांना देण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ४ वाजता वसईत त्यांचे आगमन होणार आहे. गांवदेवी मंदिर सातिवली येथून बाईक रॅलीद्वारे त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा करून त्यात शेकडो लोक सहभागी होणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता या बाजारपेठेच्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यात मराठा समाजातील मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.