पालघरमधील काँग्रेस कार्यकर्ते शेगावला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमधील काँग्रेस कार्यकर्ते शेगावला रवाना
पालघरमधील काँग्रेस कार्यकर्ते शेगावला रवाना

पालघरमधील काँग्रेस कार्यकर्ते शेगावला रवाना

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी पालघर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी शेगाव येथे रवाना झाले आहेत. तेथून ते मध्य प्रदेशपर्यंत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, किसान सेल प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून १५० कार्यकर्ते बसने रवाना झाले आहेत. आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत मध्य प्रदेशपर्यंत चालत जाणार आहोत, असे पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर यांनी सांगितले.