चिकू बागायतीदारांच्या समस्या सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकू बागायतीदारांच्या समस्या सोडवा
चिकू बागायतीदारांच्या समस्या सोडवा

चिकू बागायतीदारांच्या समस्या सोडवा

sakal_logo
By

बोर्डी, ता. १६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील चिकू बागायतींमध्ये निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तज्ज्ञ शास्त्रज्ञांमार्फत संशोधन करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे केली आहे.
डहाणू तालुक्यातील चिकू पिकाच्या माध्यमातून मागच्या २५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती केली आहे; मात्र मागच्या काही वर्षांत विविध समस्या निर्माण होऊन झाडांची उत्पादन क्षमता घटली आहे. सुमारे आठ हजार हेक्टर जमिनीवर डहाणू तालुक्यात चिकू बागायती विकसित झाल्या आहेत; मात्र दिवसेंदिवस झाडापासून फलधारणेत घट होत असल्यामुळे उत्पादन घटले आहे. याबाबत शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादनवाढीसाठी प्रयोग करीत असले, तरी यात त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांडून या भागातील बागायतींचा पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी केली आहे.