तलासरीत मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीत मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
तलासरीत मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

तलासरीत मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) ः केंद्र शासित प्रदेशाच्या सीमेवर तलासरी तालुक्याच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत दमन बनावटीचा मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यात पीक अप टेम्पोमध्ये दमण बनावटीचे २१२ बॉक्स मध्ये २९९ बल्क लिटर दमन बनावटीच्या दारूचा साठा आणि पीक अप टेम्पो असा २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून केंद्र शासित प्रदेशाच्या सीमा भागात गस्त वाढवण्यात आली आहे. त्यानुसार तलासरी तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना उमेश हाडळ याने दमण बनावटीचा मद्यसाठा पिकअप टॅम्पोतून आणून घरालगतच्या कंपाऊंडमध्ये साठवला होता. याची माहिती मिळाल्यानंतर तेथे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेव्हा कंपाऊंड मोर उभ्या पिकअप टॅम्पोमधून एक कामगार दारूचे बॉक्स उतरवीत असल्याचे आढळले. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच कामगार पळून गेला. त्यानंतर त्या पिकअप टॅम्पोची टेम्पोची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित दमण बनावटीचा विदेशी मद्य आणि बिअरचे २१२ बॉक्स आढळून आले. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सुधाकर कदम उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकातील अधिकारी जवानांनी केली.