खर्डीत एकाच घरात तिघांना डेंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डीत एकाच घरात तिघांना डेंगी
खर्डीत एकाच घरात तिघांना डेंगी

खर्डीत एकाच घरात तिघांना डेंगी

sakal_logo
By

खर्डी, ता. १६ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरात डेंगीचा एक रुग्ण आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना डेंगीची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी दिली. हे तीन रुग्ण एकाच घरातील आहेत. बिरवाडी येथे एक रुग्ण आढळला असल्याची प्राथमिक माहिती खासगी डॉक्टरकडून मिळाली आहे.
खर्डी परिसरातील घराघरात तत्काळ साथीच्या आजाराचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असून खर्डीत धूरफवारणी व डासनिर्मूलन फवारणी करण्यासाठी पत्र देण्यात आले असल्याचे टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन चव्हाण यांनी सांगितले. सायबा शफिक शेख (वय १४) या मुलीची डेंगीची तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर घरात राहणाऱ्या दोघांना लागण झाली. उपचार घेऊन बऱ्या झालेल्या सायबाला पुन्हा लागण झाली असून तिच्यावर घरी उपचार सुरू आहेत. यासंदर्भात उद्यापासून धूर व डास निर्मूलन फवारणी करण्यात येणार असून ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे उपसरपंच मोसीम शेख यांनी सांगितले.