शैक्षणिक संचालकाला ब्लॅकमेल करणारे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक संचालकाला ब्लॅकमेल करणारे गजाआड
शैक्षणिक संचालकाला ब्लॅकमेल करणारे गजाआड

शैक्षणिक संचालकाला ब्लॅकमेल करणारे गजाआड

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ (वार्ताहर) ः शैक्षणिक संस्थेत अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करीत संस्थेच्या संचालकाला ब्लॅकमेल करून दोन लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची रक्कम घेताना ठाणे खंडणीविरोधी पथकाने दोघांना अलीकडेच अटक केली. अटक आरोपींची नावे दिलीप साठे ऊर्फ दिलीप पाटील (वय २९) व विकास कांबळे (वय २३) अशी आहेत. शैक्षणिक संस्थेचे संचालक आणि फिर्यादी राकेश शंकर शेट्टी यांनी शाळेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. हे बांधकाम नियमित करण्यासाठी दोन लाखांची मागणी करीत एक लाख रुपयांवर तडजोड झाली होती. आरोपींविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. नाळे करीत आहेत.