बालविवाहाचा डाव उधळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाहाचा डाव उधळला
बालविवाहाचा डाव उधळला

बालविवाहाचा डाव उधळला

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ : ठाणे शहरातील कळवा- खारेगाव येथील एका झोपडपट्टीत बालविवाह सोहळ्याचा डाव ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने बुधवारी (ता. १६) उधळून लावला. बालविवाह रोखण्यात ठाणे शहर पोलिसांना एका सामाजिक संस्थेच्या मदतीने यश आले आहे.
सलाम बालक चाईल्ड लाईन संस्थेच्या श्रद्धा नारकर यांनी कळवा खारेगाव येथील शांतिनगर झोपडपट्टीत बालविवाह सोहळा पार पडत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना माहिती दिली. एवढेच नाही, तर त्या स्वतः व बाल संरक्षण पथकातील पोलिसांसह मंडपात दाखल झाल्या. त्या वेळी हळदीचा कार्यक्रम उरकला होता आणि पुढील लग्नाची तयारी सुरू झाली होती. पोलिसांनी त्या १९ वर्षीय मुलासह १६ वर्षीय मुलीला आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी त्या दोघांच्या नातेवाईकांना बालविवाह न करण्याबाबत सूचना दिल्या आणि हा विवाह न करण्याबाबत त्यांचे मनपरिवर्तन केले आहे. तसेच त्या दोघांच्या नातेवाईकांकडून हा विवाह पुढे ढकलण्यात आल्याचे बंधपत्र लिहून घेतल्याची अशी माहिती पोलिसांनी दिली.