घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावर दोन अपघात. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावर दोन अपघात.
घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावर दोन अपघात.

घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावर दोन अपघात.

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १६ (बातमीदार) ः घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर बुधवारी (ता. १६) सकाळी दोन अपघात झाले. या दोन्ही अपघातांत जीवितहानी झाली नाही, त्यामुळे त्यांची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर बुधवारी पहाटे एका डंपरने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरजवळ दुभाजाकला धडक दिली; तर दुसरीकडे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एका कारने कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक भिंतीला धडक दिली. या धडकेत संरक्षक भिंतीचा भाग कारच्या आरपार घुसला. वाहतूक विभागाने ही कार त्या ठिकाणाहून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. याविषयी मानखुर्द पोलिस ठाण्यात नोंद नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले. देवनार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ राजेश केवले यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.