- रेल्वेला हरित ऊर्जेचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

- रेल्वेला हरित ऊर्जेचा आधार
- रेल्वेला हरित ऊर्जेचा आधार

- रेल्वेला हरित ऊर्जेचा आधार

sakal_logo
By

रेल्वेला हरित ऊर्जेचा आधार
सोलर प्लांटमुळे तीन कोटींहून अधिक रुपयांची बचत

मुंबई, ता. १७ : विजेची बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी पश्चिम रेल्वेने आपली ९७ स्थानके आणि ४६ कार्यालयीन इमारतींवर सोलर प्लांट बसविले आहेत. त्याआधारे वर्षभरात ७५ लाख ५३ हजार १७८ युनिट हरित ऊर्जा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीन कोटींहून अधिक रुपयांची बचत करण्यात रेल्वेला यश आले आहे.

२०२१-२२ मध्ये सौरऊर्जेद्वारे पश्चिम रेल्वेवर ७५,५३,१७८ युनिट हरित ऊर्जा निर्माण करण्यात आली. त्यामुळे ३ कोटींहून अधिक रुपयांची मोठी बचत झाली. २०२२-२३ या वर्षासाठीची संचयी बचत २.१५ कोटी आहे. त्यात ऑक्टोबर २०२२ मधील ३०.२२ लाखांच्या बचतीचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात २०२१-२२ मध्ये ३६,१९,२४१ किलोवॉट ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे १.४९ कोटींची बचत झाली. चालू वर्षात ऑक्टोबर २०२२ पर्यंत २५,७२,७९० किलोवॉट ऊर्जा निर्माण झाली आहे. परिणामी १.११ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या लहान स्थानकांवर असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर स्थानकांवरील उपकरणे जसे की दिवे, पंखे, संगणक आणि पथदिवे लावण्यासाठी केला जातो. प्रमुख स्थानकांवर सौरऊर्जा ग्रीडमध्ये प्रसारित केली जाते आणि वीजबिल मीटरच्या बिलिंग प्रणालीद्वारे प्राप्त केली जाते, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

- पश्चिम रेल्वेच्या ९७ स्थानकांवर ६ हजार ६३५ किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट
- ४६ हून अधिक रेल्वे कार्यालयांच्या इमारतींमध्ये ३९२०.४८ किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट