Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dearness Allowance
एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता

Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील ८९ हजार कर्मचाऱ्यांना आता ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहेत. महागाई भत्त्याच्या अंतिम प्रस्तावाला राज्य सरकारने आज मंजुरी दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात महिन्याला ६ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी सहा टक्क्यांची वाढ झाल्याने महागाई भत्ता एकूण ३४ टक्के झाला. त्याच धर्तीवर एसटीच्या कर्मचाऱ्‍यांनादेखील ३४ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडे सुमारे तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. अखेर राज्य सरकारने त्यावर बुधवारी (ता. १६) निर्णय घेऊन मंजुरी दिली. याचा लाभ महामंडळातील ८९ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्त्यामुळे महामंडळावर महिन्याला १८ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना