मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीवरून शिवसैनिकांवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीवरून शिवसैनिकांवर हल्ला
मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीवरून शिवसैनिकांवर हल्ला

मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीवरून शिवसैनिकांवर हल्ला

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ : मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीवरून शिंदे गटाच्या गुंडांनी किसननगर येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर भ्याड हल्ला केल्याचा आरोप करणारी व्हिडीओ क्लिप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी बुधवारी (ता. १६) स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसारित केली आहे. त्यामध्ये या हल्ल्यावर ठाण्यातील तमाम शिवसैनिकांकडून चोख उत्तर दिले जाईल, असा इशारावजा दमही दिला आहे.
विचारे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही क्लिप प्रसारित करण्यापूर्वी खासदारांचे पत्र आणि एक व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमावर झळकली होती. त्यानंतर आताच्या या क्लिपमध्ये खासदारांनी शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे समीकरण शिंदे गटाला डोईजड व्हायला लागले असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या किसननगरपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. या कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटाची पायाखालची वाळू सरकवली आहे. हे सत्य शिंदे गटाला पचनी पडत नाही, म्हणून सोमवारी किसननगर येथील ठाकरे गटाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या चिथावणीवरून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर शिंदे गटाने भ्याड हल्ला केला, असा आरोप करताना या हल्ल्यात दोन शिवसैनिक जखमी झाल्याचे म्हटले आहे.