‘किन्‍हवली ग्रामीण रुग्‍णालयासाठी प्रस्‍ताव द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘किन्‍हवली ग्रामीण रुग्‍णालयासाठी प्रस्‍ताव द्या’
‘किन्‍हवली ग्रामीण रुग्‍णालयासाठी प्रस्‍ताव द्या’

‘किन्‍हवली ग्रामीण रुग्‍णालयासाठी प्रस्‍ताव द्या’

sakal_logo
By

किन्हवली, ता. १७ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि जिल्ह्यात नवोदय विद्यालय मंजूर व्हावे, यासाठी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्‍ताव सादर करण्‍याचे आदेश दिले आहेत.
किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नव्याने प्रशस्त व सुसज्ज अशी इमारत झाली असून तिथे अपुऱ्या सुविधा व मनुष्यबळ कमी असल्याने या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा. तसेच, ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने नवोदय विद्यालय पालघर येथे राहिले. सात वर्षांनंतरही ठाणे जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर न झाल्याने ते शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील आरक्षित जागेवर व्हावे, अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. बरोरा यांच्या पत्रांची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य व शालेय शिक्षण विभागाच्या दोन्ही सचिवांना मुख्यमंत्री कार्यालयाकडे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.